। लखीसराय । दि.17 नोव्हेंबर । सिकंदरा-शेखपुरा एनएच-333 वर हलसी पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरा गावाजवळ मंगळवारी ट्रक आणि सुमोमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच जण अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुशांत सिंग राजपूतचा मेहुणा लालजीत सिंग याचाही अपघातात मृत्यू झाला आहे. ते हरियाणामध्ये एडीजी म्हणून तैनात होते. यासोबतच मृतांमध्ये दोन बहिणी आणि अन्य दोन नातेवाईकांचाही समावेश आहे.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस स्टेशन हद्दीतील सगदाहा भंडारा गावातील लालजीत सिंह यांची पत्नी गीता देवी हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून ड्रायव्हरसह 10 लोक सुमो गोल्ड गाडीतून गावाकडे परतत होते.
पिपरा गावातील अपग्रेडेड मिडल स्कूलजवळ समोरून येणार्या एलपीजी भरलेल्या ट्रकला टाटा सुमोची धडक बसली. या अपघातात विकटामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून
मृतांमध्ये लालजीत सिंग, नेमानी सिंग, रामचंद्र सिंग, बेबी सिंग, अनिता सिंग आणि प्रीतम सिंग यांचा समावेश आहे. सहा जणांव्यतिरिक्त चार जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना सिकंदरा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
Tags:
Maharashtra