जिल्हा पोलीस प्रमुखांच्या हस्ते पुष्पा सोनवणे व अर्चना काळे यांचा सन्मान

नाशिकमध्ये झालेल्या खुल्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेतील महिला खेळाडू चमकल्या

जिल्हा पोलीसप्रमुखांच्या हस्ते पुष्पा सोनवणे व अर्चना काळे यांचा सन्मान

। अहमदनगर । दि.22 नोव्हेंबर ।  व्हेटरन्स स्पोर्टस् अ‍ॅण्ड गेम्स असोसिएशन नाशिक व महाराष्ट्र यांच्या वतीने पहिल्या राष्ट्रीय व्हेटरन्स स्पोर्टस् अ‍ॅण्ड चॅम्पीयनशीप खेळ महाकुंभचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नगरमधील पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल पुष्पा सोनवणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्चना काळे यांनी यश संपादन केले आहे.

या खुल्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत पोलीस दलात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल व महिला खेळाडू पुष्पा सोनवणे यांनी भालाफेक व गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे, तसेच थाळीफेक स्पर्धेतही यश संपादन केले आहे, 

तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्चना काळे यांनी 100, 200 व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सरासरी द्वितीय क्रमांक मिळवून सिल्व्हर पदक प्राप्त केले आहे. याबद्दल पुष्पा सोनवणे व अर्चना काळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वेळी मनोज पाटील म्हणाले की, नगरमधील पोलीस दलातील महिला व पुरुष खेळाडू नेहमीच विविध राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावरील स्पर्धेत सहभागी होतात. आतापर्यंत अनेक पदके त्यांनी मिळविली आहेत. पुष्पा सोनवणे व अर्चना काळे यांनी मिळविलेले स्पृहणीय व प्रशंसनीय आहे. 

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करतो. यश हे त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे मिळते. पोलीस दलातील खेळाडूंनी विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी असे सांगितले. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी यावेळी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post