। औरंगाबाद । दि.22 नोव्हेंबर । जिल्ह्यात काेराेना लसीकरण कमी हाेत असल्यामुळे पेट्रोल पंप चालकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच पेट्रोल द्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. तसे अादेश ९ नोव्हेंबरला जारी केले होते.
मात्र, दहा दिवसांनंतरही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण रविवारी संध्याकाळी बाबा पेट्रोल पंपसमोर येऊन थांबले. तेव्हा अर्ध्या तासात एकालाही प्रमाणपत्र विचारले नाही. हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट हा पंप सील करण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले.
‘नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल’ या आदेशाचा भंग करणे, मास्कचा वापर न करणे, लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करणे या कारणांमुळे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सोनाली जोंधळे व जिल्हा पुरवठा निरीक्षक राजेंद्र शिंदे यांनी रात्री ८.३० वाजता बाबा पेट्रोल पंप सील केला. जिल्हाधिकारी म्हणाले, आज एक पंप बंद केला, यानंतर इतरही पंपावर कारवाई होईल.
आता पेट्रोल देणार नाही
पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले की, ज्यांनी लस घेतली नाही त्यांना पंपावरच लस देण्याची व्यवस्था करा, असे अाम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले हाेते. मात्र, आता कारवाई होत असल्यामुळे लस न घेणाऱ्यांना अाम्ही पेट्रोल देणार नाही.
Tags:
Maharashtra