प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व ना.अशोकराव चव्हाण यांच्याकडून पद्मश्री पोपटराव पवार यांचे व्हिडीओ काँलद्वारे अभिनंदन

। अहमदनगर । दि.15 नोव्हेंबर । पद्मश्री पोपटराव पवार यांचे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी व्हिडीओ काँलद्वारे पद्मश्री मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी आज हिवरेबाजार येथे जाऊन प्रदेश काँग्रेसच्यावतीने पद्मश्री पोपटराव पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांनी पद्मश्री पवार यांच्याशी व्हिडीओ काँलद्वारे संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले व तुमच्या अनुभवाचा उपयोग आता राज्यभर होईल ,असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण म्हणाले, पोपटरावांनी ग्रामविकासात केलेले कार्य कौतुकास्पद असुन या कामाचा आणि त्याबद्दल त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराचा आम्हाला अभिमान वाटतो.

प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,आपल्या जीवलग मित्राला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद होत आहे.

पोपटरावांना आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र पद्मश्री पुरस्काराने त्यांच्या कामाला आता राजमान्यता मिळाली आहे.

यावेळी जगदीश देशमुख, अरुण ठाणगे,मुकुल देशमुख, हर्षवर्धन देशमुख, ज्ञानेश्वर आव्हाड उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post