सावखेडा बु. येथील जवान नक्षली हल्ल्यात शहीद

 

। जळगाव । दि.15 नोव्हेंबर ।  सावखेडा बु (ता. पाचोरा) येथील मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय 36) हे जवान शनिवार (ता. 14) पहाटे पावणे दोनच्या सुमारास नक्षलवाद्यांच्या  गोळीबारात गोळी लागून शहीद झाले. शहीद होण्याची वार्ता कळताच परदेशी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला.

ही वार्ता रविवारी सकाळी मयत जवानांच्या कुटुंबियांना त्यांच्या कार्यालयाकडून कळविनयात समजताच सावखेडा बुद्रुक गावासह तालुक्यात शोककळा पसरली. शहीद जवान मंगलसिंग परदेशी हे 734 टीपीटी (डब्ल्यूकेएसपी) येथे नियुक्तीस होते. 

14 नोव्हेम्बरला गेट नंबर दोनवर गार्ड ड्युटी बजावत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात त्यांच्या खांद्याला गोळी लागून ते जखमी झाले. त्यांना त्वरित लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

चार वर्ष सेवावाढ : शहीद मंगलसिंग परदेशी यांना चार वर्ष सेवावाढ मिळालेली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व सैन्यात नोकरी मिळवली.

Post a Comment

Previous Post Next Post