पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली : किरण काळे

अभिनेत्री  कंगना  राणावतच्या  देशद्रोही  वक्तव्यामागे  जातीयवादी  पक्षांचा  हात  असल्याची काँग्रेसची टीका
। अहमदनगर । दि.15 नोव्हेंबर ।  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली. आजचा भारत याच भक्कम पायाभरणी वरती उभा आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

काँग्रेस नेते पंडित नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लालटाकी येथील ऐतिहासिक नेहरू पुतळ्याला हार घालून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, माजी नगरसेविका जरीना पठाण, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा सरचिटणीस इमरान बागवान, 
 
काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉक्टर बापू चंदनशिवे, काँग्रेस क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, सागर दळवी आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

काळे म्हणाले की, देशातील जातीयवादी पक्ष आज स्वातंत्र्यलढ्याचा अवमान होईल अशा पद्धतीचे गैरवर्तन करत आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने केलेले वक्तव्य हे संतापजनक असून यामागे देशद्रोही विचारसरणीच्या जातीयवादी पक्षांचा हात असून या माध्यमातून देशामध्ये अशांतता माजविण्याचा त्यांचा छुपा अजेंडा असल्याची टीका काळे यांनी भाजपचे नाव न घेता केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post