जलवाहिनी विळद गावाजवळ फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत


। अहमदनगर । दि.15 नोव्हेंबर । सोमवारी शहराचा पाणीपुवरठा विस्कळीत झाला आहे. नगर शहरालास पाणीपुरवठा करणारी नविन मुख्य 813 एम.एम.जलवाहिनी विळद गावाजवळील आढाव पाटील लॉन समोर फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे दोन दिवस पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी शहरास पाणीपुरवपठा करणारी नविन मुख्य जलवाहिनी विळद गावाजवळील आढावा पाटील लॉन समोरील ठिकाणी नगर-कोरपगाव महामार्गाचे खासगी ठेकेदारामार्फत दुुरुस्तीचे चालू सुरु असलेल्या कामा दरम्यान पोकलॅन मशनिचा धक्का लागून फुटलेली आहे. जलवाहिनीचे काम मनपाने तातडीने हाती घेतले आहे.

परंतु दुरुस्ती कामात अवधी लागणार असल्याने व दरम्यानच्या काळात सदर जलवाहिनीद्वारे विळद पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने सोमवारी दि.15 रोजी दुपार नंतर पाणी वाटप सुरु असलेल्या सावेडी उपनगरातील ढवणवस्ती परिसर, स्टेशन रोड परिसर, विनायकनगर, माणिकनगर, आगरकर मळा इत्यादी भागात पाणीपुररवठा बंद असल्याने तो मंगळवारी दि.16 रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल. तसेच जलवाहिनी दुुरुस्ती कामा दरम्यानच्या काळात सदर जलवाहिनीद्वारे होणारा उपसा बंद असल्याने शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या भरणे शक्य होणार नाही.

त्यामुळे मंगळवार दि.16 रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडाई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी इत्यादीसह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी, परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिकसप हाडको, विनायकनगर, आगरकर मळा इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसुन तो बुधवार दि.17 रोजी नेहमी प्रमाणे वेळेत करण्यात येईल.

तसेच बुधवारहृद.17 रोजी रोटेशनप्रमाणे पाणी वाटपाच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, नालेगाव, माळीवाडा (काही भाग) चितळेरोड, कापडबाजार, तोफखाना इ. भागासह सावेडी, बालिकाश्रम रोड परिसर, नगर कल्याण रोड परिसर, सारसनगर, बुरुडगाव रोड परिसर, इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसुन तो गुरुवार दि.18 रोजी नेहमीप्रमाणे करण्यात येईल. नागरीकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा वापर काटकसरीने करुन मनपास सहकार्य करावे असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे व मनपा आयुक्त शंकर गरे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post