पोलिसांनी नेमलेल्या पथकांना यश येईना
। अहमदनगर । दि.24 नोव्हेंबर । बेकायेदशीर बायोडिझेल साठा व विक्री प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 22 जणांची नावे निष्पन्न झाली असली व यात पोलिसांनी 10 जणांना अटक केलेली असली तरी उर्वरीत 12 आरोपींचा पोलिसांना अद्याप शोध लागलेला नाही. दोन पथके आरोपींचा शोध घेत आहेत. यामध्ये शिवसेनेचा माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते याचाही समावेश आहे.
हे देखील वाचा...विवाहितेस शिवीगाळ करुन विनयभंग, गुन्हा दाखल
बायोडिझेल प्रकरणात पोलिसांच्या कारवाईकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. मात्र, या पथकांना अद्याप पसार आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. केडगाव येथील बाह्यवळण चौकात पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत बेकायदेशीर बायोडिझेलचा साठा आढळला होता.
हे देखील वाचा...भरदिवसा सिध्दार्थनगरमध्ये घरात घुसून रोकड पळवली
या कारवाईत सुमारे 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक केलेल्यांकडे पोलिसांनी केलेल्या तपासात 22 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील पसार 12 आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र, पोलिस रिकाम्या हाताने परत येत आहेत.
हे देखील वाचा...विवाहितेस शिवीगाळ करुन विनयभंग, गुन्हा दाखल
पोलिसांना द्यावे लागणार पत्र
नगर शहर व नगर तालुक्यात उघड झालेल्या बायो डिझेल प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना आदेश दिले असून, आपल्या हद्दीत अवैध बायोडिझेल विक्री सुरू असेल तर ती त्वरित छापे टाकून व कारवाई करून बंद करण्याचे यात म्हटले आहे. तसेच आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध बायोडिझेल विक्री होत नसल्याचे पत्रही पोलीस अधीक्षकांना सादर करावे. आणि त्यानंतर एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध बायोडिझेल विक्री होत असेल आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकला तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी त्याला जबाबदार राहील. त्यामुळे आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बायोडिझेल विक्री होत नाही असे पत्र 1 डिसेंबरपर्यंत सर्व पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी पोलिस अधीक्षकांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.