भाडोत्री दिलेली रिक्षा पळवली

 

। अहमदनगर । दि.22 नोव्हेंबर । स्वमालकीची रिक्षा भाड्याने चालविण्यासाठी दिलेली असताना संबंधिताने ही रिक्षा चोरुन नेल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू गनी शेख (रा.तांबटकर गल्ली, नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुणाल आनंदा माळवे (रा.ब्रह्मतळे, भिंगार) असे आरोपीचे नाव आहे.

शेख यांनी मागील सात ते आठ महिन्यापासून माळवे यास त्यांची रिक्षा (एमएच 16 सीई 1570) ही भाडेतत्वावर चालविण्यास दिली आहे.

 त्यापोटी दररोज 250 रुपये भाडे माळवे हा शेख यांना देत होता. 17 नोव्हेंबर रोजी माळवे याने भाडे न दिल्याने शेख यांनी जाऊन विचारपूस केली असता, त्याने तुमची रिक्षा मला माहिती नाही, असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली

. शेख यांनी रिक्षाचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे शेख यांनी भिंगार पोलिसात फिर्याद दिली असून, त्यानुसार माळवे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक पी. सी. गंगावणे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post