नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगर मनपाला पुरस्कार प्रधान

नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगर मनपाला पुरस्कार प्रधान

नगर शहराचा स्वच्छतेमध्ये देशात डंका

नगरवासीयांच्या सहकार्यामुळेच नगर मनपाचे स्वच्छतेत यश

मनपा राज्यात दुसरी तर देशात 22 व्या स्थानी : माजी महापौर बाबासाहेब वाकळे


। अहमदनगर । दि.22 नोव्हेंबर । संत गाडगेबाबा यांनी देशाला स्वच्छतेचा संदेश देत हातामध्ये झाडू घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पटवून दिले.आज ही आपण सर्वजण स्वच्छतेवर काम करत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले भारत स्वच्छ अभियान हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. अहमदनगर मनपाने या अभियानामध्ये भाग घेऊन 2019-20 मध्ये 273 व्या क्रमांकावरून 40 व्या क्रमांकावर झेप घेतली.

एवढ्यावरच नगर मनपा न थांबता 2020-21 मध्ये नगर मनपा राज्यात दुसरी तर देशात 22 व्या क्रमांकावर झेप घेतली. यामुळे आपले शहर हगणदारी मुक्त,कचराकुंडी मुक्त व स्वच्छ शहर म्हणून देशांमध्ये ओळख निर्माण झाली. यामुळे स्वच्छतेत देशांमध्ये नगर महापालिकेने मानाचा तुरा रोवला हे सर्व शक्य झाले ते संपूर्ण नगरवासीयांच्या सहकार्यामुळेच अशी भावना मा.महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित अहमदनगर महापालिकेला स्वच्छतेमध्ये थ्री स्टार मानांकनचा पुरस्कार स्वीकारताना मा.महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त शंकर गोरे उपस्थित होते.

माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले की, कोविड संसर्गजन्य विषाणूच्या काळातही नगरवासियांनी स्वच्छतेत मोठे योगदान दिले. या कामासाठी सर्वपक्षीय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, स्वच्छता दूत याचबरोबर पुणे येथील अभियांत्रिकी विद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नगर मनपाने कायमस्वरूपी स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावला आहे नगर शहरात कुठेही कचराकुंडी दिसणार नाही दररोज कचर्‍याचे संकलन करण्यासाठी घरोघरी घंटागाडी फिरवली जाते व त्यानंतर या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याचे खतात रूपांतर केले जाते. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यास आपल्या सर्वांना यश मिळाले आहे असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post