शहरातील करदात्यांना शास्ती मध्ये 75 टक्के सूट देऊन 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी : आमदार संग्राम जगताप यांचे आयुक्तांना पत्र


 । अहमदनगर । दि.17 नोव्हेंबर । कोरोना संसर्ग विषाणू हा गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठे आर्थिक आणि आरोग्य संकट आहे. यामुळे उत्पादन, रोजगार आणि लोकांच्या आरोग्यावर अभूतपूर्व नकारात्मक परिणाम झालेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने करदात्याला कर भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देऊन 75 टक्के सूट द्यावी अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी पत्राद्वारे केली.

शहरातील करदात्यांनी मला भेटून माझ्याकडे मागणी केली आहे की महापालिकेचा जो मालमत्ता कर आकारते ते भरण्यास नागरिक तयार आहे पण काही आर्थिक अडचणीमुळे अनेक करदाते महापालिकेने दिलेल्या मुदतीत भरू शकले नाही यामुळे या करदात्यांना मालमत्ता करामध्ये शास्तीकर लागलेला आहे .

जर ही शास्ती आपल्या अधिकारात 75 टक्के सूट देऊन 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाल्यास अनेक करदाते उस्फूर्तपणे थकबाकी भरण्यास तयार होतील त्यामुळे थोड्याफार प्रमाणात महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. यातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करता येईल. तरी करदात्यांना सूट द्यावी अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार संग्राम जगताप यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post