बाधित रुग्णांचा आकडा शंभरीच्या आतमध्ये...आज 99 रूग्णांना डिस्चार्ज

आज ९९ रूग्णांना डिस्चार्ज तर  

नव्या ७१ बाधितांची रुग्ण संख्येत भर
 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८४ टक्के 


 
। अहमदनगर । दि.14 नोव्हेंबर । जिल्ह्यात आज ९९ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार २५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६१२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६ आणि अँटीजेन चाचणीत ३९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, नगर ग्रा. ०२, पारनेर ०१ आणि श्रीगोंदा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, जामखेड ०१, कर्जत ०१, नेवासा ०१,  पारनेर ०६, पाथर्डी ०४, राहुरी ०२, संगमनेर ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३९ जण बाधित आढळुन आले. अकोले ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०३, पारनेर ०२, राहता ०४, राहुरी ०३, संगमनेर ०२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०५, इतर जिल्हा ०४ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २१, अकोले ०५, कर्जत ०२, कोपरगाव १३,नगर ग्रा. ०२, नेवासा ११, पारनेर ०४, पाथर्डी ०२, राहाता ०८, राहुरी १०, संगमनेर १२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या : ३,४८,२५३

*उपचार सुरू असलेले रूग्ण : ६१२

*पोर्टलवरील मृत्यू नोंद : ७०८४

*एकूण रूग्ण संख्या : ३, ५५, ९४९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक १४ नोव्हेंबर, २०२१

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

Post a Comment

Previous Post Next Post