। ठाणे । दि.17 नोव्हेंबर । बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष, डॅा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघटनेच्यावतीने व्याख्यात्ये गणेश शिंदे यांना कोरोना काळातील प्रबोधनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल कोव्हीड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गणेश शिंदे हे अनेकवर्षांपासून व्याख्यानाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करतात. सहकार, ग्रामविकास, स्वच्छता या सामाजिक विषयांसोबतच विवध अध्यात्मिक विषयांवर त्यांची व्याख्याने होत असतात.
कोरोनाकाळात सर्व जण घरात बसलेले असताना गणेश शिंदे यांनी कोरोनाग्रस्तांना आधार देण्यासाठी समाजप्रबोधनाची सेवा अखंडपणे सुरु ठेवली. गंभीर विषय सहजपणे श्रोत्यांच्या गळी उतरवणे हा त्यांच्या वक्तृत्वाचा विशेष पैलू आहे.पुणे, अहमदनगर, बीड, या जिल्ह्यांमधील कोरोनाकक्षातील बाधीतांना खंबीर राहाण्याचा सल्ला दिला.
त्यांचे मनोधैर्य खचू नये यासाठी प्रबोधन केले.कोरोनाने खचलेल्या, अस्वस्थ झालेल्या रुग्णांना गणेश शिंदे यांनी थेट रुग्णांसोबत संवाद साधून आधार दिला. त्यांच्या याच कोरोनाकाळातील सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचा नगर विकास मंत्री एकनाथ जी शिंदे व राज्यमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी राज्यमंत्री बच्च कडू, पद्मश्री तात्याराव लहाने,खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील, आमदार निलेश लंके यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या दमदार वक्तृत्वासाठी गणेश शिंदे कायम चर्चेत राहिले आहेत. पण कोरोना काळात त्यांनी कोव्हिड सेंटर मध्ये जाऊन प्रबोधन करण्याचे धाडस दाखवले ही विशेष बाब आहे. यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. दि.१४ नोव्हेंबर २०२१ रोजी ठाण्यातील डॅा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.