। मुंबई । दि.15 ऑक्टोबर । देशभरात सुरू असलेल्या इंधन दरवाढीत आज दसऱ्याच्या मुहूर्तावरही खंड पडलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल प्रतिलिटर ३४ आणि डिझेल प्रतिलिटर ३८ पैशांची महागले आहे.
गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर १११.०९ रुपये आणि डिझेलचा दर १०१.७८ रुपये इतका झाला आहे.
तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०५.१२ रुपये आणि ९३.९२ रुपये इतका आहे. दरम्यान, इंधन दरवाढ अशीच सुरू राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलिटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Tags:
Maharashtra