राहात्यामध्ये एक नंबर कांद्याला मिळाला पावणे चार हजाराचा भाव

राहात्यामध्ये एक नंबर कांद्याला मिळाला पावणे चार हजाराचा भाव 


। अहमदनगर । दि.15 ऑक्टोबर । येथील राहाता बाजार समितीत कांद्याच्या दोन हजार 601 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्याला  3600 रुपयांचा भाव गुरुवारी मिळाला.

कांद्याला मागील आठवड्यात मागणी चांगली होती. त्यामुळे भावातही वाढ होत होती. मात्र आता बाहेरील राज्यातून कांद्याला मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भावावर होत आहे.

कांद्याच्या भावात घसरण सुरु झालेली आहे. मागणी जास्त व भाव कमी अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक नाराज झालेले आहेत.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा :  3200 ते 3600, दोन नंबर कांदा :  2350 ते 3150 तीन नंबर कांदा : 1100 ते 2300, गोल्टी कांदा 2400 ते 2700 व जोड कांदा 300 ते 1000.

Post a Comment

Previous Post Next Post