। अहमदनगर । दि.15 ऑक्टोबर । भिंगारपासून जवळच असलेला व नगर-पाथर्डी रस्त्यावरून जाताना दिमाखात स्वतःचे वेगळेपण व ऐतिहासिक महत्त्व दाखवणारा चाँदबीबीचा महाल गुरुवारी सायंकाळी विद्युत रोषणाईने उजळून निघाला. तीन रंगांच्या या विद्युत रोषणाईने या महालाच्या दगडी भिंतींना अनोखी झळाळी आली. या विद्युत रोषणाईचे निमित्त होते-भारतीय स्वातंत्र्याचा साजरा होत असलेला अमृत महोत्सव तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा 100 कोटींचा टप्पा भारताने पार केल्याचे.
भारताचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताने 100 कोटी लसीकरणाचा आकडा यशस्वीपणे पार केला, यानिमित्ताने देशातील शंभर राष्ट्रीय संरक्षित स्मारकांवर दसर्याच्या आदल्या दिवशीच्या सायंकाळी विद्युत रोषणाई करण्यात येणार होती. केंद्रीय आरोग्य विभाग आणि पुरातत्व विभागातर्फे हा उपक्रम एकाच वेळी एकाच दिवशी देशपातळीवर राबविण्यात आला.
यासाठी निवडण्यात आलेल्या संरक्षित वास्तूंमध्ये नगरमधील चाँदबीबी महालाचा समावेश होता. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाच्या नगर कार्यालयाने तशी तयारी केली व गुरुवारी (ता. 14) सायंकाळी सात ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत चाँदबीबी महाल विद्युत रोषणाईने उजळून गेला. केंद्रीय पुरातत्व मंत्रालयाच्या औरंगाबाद विभागाचे पुरातत्व अधीक्षक डॉ. मीलनकुमार चावले यांच्या मार्गदर्शनाखाली चाँदबीबी महालावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे नगरचे सहायक संरक्षक मनोज पवार यांनी सांगितले.
चाँदबीबी महालावरील विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश देण्यात आला नव्हता. कारण, कोणत्याही राष्ट्रीय संरक्षित स्मारकामध्ये सायंकाळी सहा वाजल्यानंतर प्रवेश नसतो. मात्र, नगर व भिंगारमधील नागरिकांनी चाँदबीबी महालाच्या आजूबाजूच्या परिसरातून या विद्युत रोषणाईचा आनंद घेतला, असेही पवार यांनी सांगितले.

Tags:
Ahmednagar