। अहमदनगर । दि.01 सप्टेंबर । शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भरारी घेत अव्वल क्रमांक प्राप्त केला असून संस्थेच्या उत्तर विभागात कला शाखेत प्रथम व द्वितीय क्रमांक आणि वाणिज्य शाखेत तृतीय क्रमांक महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राप्त केला असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी दिली.
रयतच्या उत्तर विभागात अहमदनगर, नाशिक व बीड जिल्ह्याचा समावेश होतो इयत्ता बारावी मध्ये या उत्तर विभागात कला शाखेत प्रथम क्रमांक कु. पायल राजेंद्र पालक 95.50% , द्वितीय क्रमांक कु. वैशाली गोरक्षनाथ गवते 93.33% तर वाणिज्य शाखेत कु. भैरवी अरुण भुतकर 93.83 गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम तर विभागात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेचा निकाल 100% लागला असून एकूणच शेकडा गुणांमध्ये सुध्दा महाविद्यालयातील विद्यार्थिनी आघाडीवर असल्याचे जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. सतीश शिर्के यांनी सांगितले.
महाविद्यालयातील मुलींच्या या गुणवत्तेबद्दल व यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा रयतच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे विकास समिती सदस्य स्नेहल शिंदे, उपप्राचार्य रामदास बर्वे, उपप्राचार्य नासिर सय्यद, पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Tags:
Ahmednagar