सुप्रीय स्वाधार अभियान’ नगर शहरात गरजूंन पर्यत पोहोचविणार : रेश्मा आठरे

। अहमदनगर । दि.01 सप्टेंबर । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ’सुप्रीय स्वाधार अभियान’ राज्यभर सुरु झाले आहे. या माध्यमातून शासनाच्या श्रावण बाळ योजना व संजय गांधी योजना आम्ही समाजातील गरजू घटकांपर्यंत आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोहोचविणार आहोत.

गेल्या दीड-दोन वर्षापासून कोरोनाचे महाभयंकर संकट आपल्या वर ओढविले आहे या काळात अनेक कुटुंबियांवर आघात केला आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा कोविड काळात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.

कोरोनाच्या काळात दुर्दैवी मृत्यू पावणार्‍या पतीच्या पत्नीला संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना गरजू महिलांपर्यंत पोहो चवण्याचे काम आम्ही करणार असल्याची माहिती महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी  सांगितले.

संजय गांधी निराधार योजनेसाठी पतीचा मृत्यू दाखला, तलाठ्याचा रहिवासी दाखला, तहसीलदाराचे 21 हजाराचे उत्पन्न असलेला दाखला, वयाचा दाखला, रेशन कार्ड,मुलांचे वयाचे दाखले, पासपोर्ट फोटो, प्रतिज्ञापत्र, मतदार यादीतील नाव असलेली झेरॉक्स, दारिद्रयादीत नाव असलेल्या मनपाचा दाखला आधी सर्व कागदपत्रे या योजनेसाठी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच श्रावण बाळ योजना मिळवण्यासाठी लागणारे कागदपत्र (65 पेक्षा जास्त वय) असणार्‍यांसाठी तलाठ्याचा रहिवासी दाखला, तहसीलदाराचे 21 हजाराचे उत्पन्न असलेला दाखला, वयाचा दाखला, रेशन कार्ड,मुलांचे वयाचे दाखले, पासपोर्ट साईज फोटो, दारिद्र यादीत असलेले मनपाचा दाखला, मतदार यादीतील नाव असलेले झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स आधी सर्व कागदपत्र या योजनेसाठी लागणारा असल्याचे आठरे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post