। अहमदनगर । दि.01 सप्टेंबर । गोवा येथे झालेल्या सिनियर व मास्टर राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत ओंकार राजेश राठोड याने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. 19 ते 40 वर्षे वयोगटात 69 किलो वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत 38 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 6 खेळाडूंवर मात करीत राठोड याने प्रथम क्रमांक मिळविला.
राठोड गेल्या दहा वर्षांपासून किक बॉक्सिंग क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करीत आहे. रुपेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तो पुण्यातील चॅम्पियन किक बॉक्सिंग ऍकॅडमीत सराव करतो. याआधी त्याने आशियाई स्पर्धेत कांस्य तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य व कांस्य पदक पटकाविले आहे. 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत इटली येथे होणार्या वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
या यशाबद्दल राठोड याचे भारतीय फेडरेशनचे अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल आणि महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार यांनी अभिनंदन केले आहे. ओंकार हा नगरमधील सूरजबन्स राठोड समाजाचे सेके्रटरी व रामप्रसाद चिवडा फर्मचे संचालक दुर्गाप्रसाद राठोड यांचा भाचा आहे. त्याचे समाजाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

Tags:
Ahmednagar