पोळ्याच्या दिवशीच खिलारी बैलांची चोरी

। अहमदनगर । दि.09 सप्टेंबर । ऐन बैल पोळ्याच्या दिवशी सुमारे दोन लाख रुपये किंतीच्या पांढर्‍या रंगाच्या खिलारी जातीच्या बैलजोडीची चोरी झाल्याची घटना नुकतीच सोमवार (दि.6) रोजी पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे घडली.

मिळालेली माहिती अशी की, येथील दत्तात्रय सखाराम इथे (रा.दरेवाडी, ता.संगमनेर) या शेतकर्‍याने घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेतकरी इथे यांनी त्यांच्या मालकीचे खिलारी जातीची बैलजोडी आपल्या घरासमोर बांधलेली असताना सोमवारी पाहटेच्या  वेळी

आरोपी बाळासाहेब पांडुरंग फड (रा.दरेवाडी), बाळू मारुती कोळेकर (रा.डिग्रस, ता.संगमनेर) यांच्यासह त्यांचे अन्य साथीदार पिकअप वाहन घेऊन आले व बैलजोडी चोरुन पिकअप वाहनात चढवत असताना शेतकरी इथे हे जागे झाले.

याचवेळी इथे यांनी याबाबत आरोपींना विचारणा केली असता त्यांना आरोपींनी धक्काबुक्की करुन बळजबरीने सुमारे दोन लाख रुपये किंमतीची बैलजोडी चोरुन नेली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post