। अहमदनगर । दि.09 सप्टेंबर । वृत्तपत्र वितरण दिनानिमित्ताने प्राथमिक स्वरूपात विक्रेत्यांचा येथील स्नेह-75 संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. मागील शनिवारी हा कार्यक्रम सावेडीत झाला. यावेळी स्नेह-75चे सदस्य उद्योजक विश्वनाथ पोंदे, अजित चाबुकस्वार, संजय गोरे, प्रमोद पंतम, शरद बेरड, विजय मते, अरुण भडांगे, पुरुषोत्तम बेत्ती आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्योजक पोंदे म्हणाले, वाचक व विक्रेते वृत्तपत्राचा कणा आहेत. वृत्तपत्र छपाईसाठी प्रिंटींग मशीन बरोबरच पत्रकार, संपादक, कॉम्पुटर ऑपरेटर यांचे जेवढे मोलाचे योगदान असते, तेव्हढे ते वृत्तपत्र वितरण करून वाचकांपर्यंत पोहोचले तरच ते सार्थकी ठरते. तेव्हा वाचक व विक्रेते वृत्तपत्राचा कणा असल्याचे स्पष्ट होते.
डिझिटल युगात आजही प्रिंट मिडिया तग धरून आहे व यावर विश्वास ठेवून वाचक वाचतात याचे श्रेय सर्व पत्रकार व संपादक यांना आहे. वाचक व विक्रेते यांचे एकमेकांशी कौटुंबिक नाते असल्यासारखे संबंध असतो. हे विश्वासाचे नाते टिकवून ठेवण्यासाठी विक्रेत्यांचा आजच्या दिवशी सन्मान करण्यात आला, असे ते म्हणाले यावेळी विक्रेत्यांनी या सन्मानाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
Tags:
Ahmednagar
