भातोडीच्या तलावातील पाणी शेजारच्या गावांना देण्यात यावे : शिवसेनेचे लघुपाटबंधारे विभागाला निवेदन

। अहमदनगर । दि.09 सप्टेंबर ।   नगर तालुक्यातील भातोडी येथील तलावाच्या सांडव्यातून जाणारे पाणी परिसरातील गावाना देण्यात यावे, याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता बी. एस. वाळके यांना दिले.

नगर तालुक्यातील भातोडी (ता.नगर) परिसरात झालेल्या पावसामुळे बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहून जात आहे. हे वाहून जाणारे पाणी कॅनॉलद्वारे सांडवा, मांडवा व दशमीगव्हाण येथील तलावात टाकून तलाव भरुन घेण्यात यावेत. या ठिकाणी कॅनॉलची सुविधा उपलब्ध आहे. या भागात टॅकर चालू आहे.

हे पाणी या गावाना दिल्यास टॅकर बंद होऊन शासनाचा पैसाही वाचणार आहे. शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. तरी भातोडी तलावाच्या सांडव्यातून जाणार्‍या पाण्याने सांडवा मांडवा व दशमीगव्हाण येथील तलाव भरण्यात यावेत.

यावेळी जिवाजी लगड, अजय बोरुडे, संतोष काळे, ज्ञानदेव लगड, उध्दव कांबळे, बाबा काळे, बाळासाहेब खांदवे, रमेश खांदवे, बुर्‍हाण शेख, अमोल निक्रड उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post