। अहमदनगर । दि.08 सप्टेंबर । पिंपळगाव माळवी :नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील महानगरपालिकेचा तलाव सलग दुसर्या वर्षी ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.या तलावाचे जलपूजन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले .
यावेळी पिंपळगाव माळवीच्या सरपंच राधिका प्रभुणे ,उपसरपंच भारती बनकर, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, मांजरसुंब्याचे सरपंच जालिंदर कदम, ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड, सुधीर गायकवाड, मेजर विश्वनाथ गुंड, सावता माळी पतसंस्थेचे प्रा. देवराम शिंदे ,कचरू सोनार व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते .या तलावाच्या भिंतीवर ते मोठमोठी झाडे वाढलेली आहेत.त्यामुळे तलावाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे असे ग्रामस्थांनी कर्डिले यांच्या निदर्शनास आणून दिले
माजी आमदार कर्डिले यांनी महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याशी फोनवरून संवाद साधून तलावाच्या भिंतीवरील झाडे काढून व्हॉलमधून लिकेज होणारे पाणी थांबविण्याची मागणी केली.आयुक्तांनी यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
