अल्पवयीन मुलीच्या आत्महत्ये प्रकरणी एकास अटक

। अहमदनगर । दि.23 ऑगस्ट । श्रीरामपूर येथील चितळी परिसरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला होता. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला शनिवारी रात्री औरंगाबाद येथून अटक केली असून तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चितळी परिसरात राहणार्‍या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुलीची आईने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादित म्हटले आहे, आकाश खरात हा आपल्या शेजारी रहायला आहे.

त्याचे आपल्या घरी जाणे येणे आहे. आपली मुलगी दररोज रात्री आई वडिलांच्या घरी झोपायला जात होती. दि. 18 ऑगस्ट रोजी ती नेहमीप्रमाणे मामाकडे झोपायला जाते, असे सांगून गेली. दुसर्‍या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे कामावर निघून गेलो.

घरी आल्यावर मुलगी घरी आली नसल्याने आई वडिलांच्या घरी चौकशी केली. ती आपल्याकडे आलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह फास घेतलेल्या अवस्थेत आकाश खरात याच्या घरात आढळून आला. त्याचवेळी आकाश फरार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

Post a Comment

Previous Post Next Post