। अहमदनगर । दि.25 ऑगस्ट । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. याबाबत युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी संयुक्त निषेध पत्रक काढले आहे.
यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे बाबतीत अतिशय मानहानीकारक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. राणे यांचे सदर चे वक्तव्य हे अतिशय मानहानीकारक व वैयक्तिक चारित्र्यहनन करणारे आहे.
मुख्यमंत्री पद हे भारतीय राज्य घटनेनुसार संवैधानिक पद असुन राणे यांच्या वक्तव्याने सदर पदाचे प्रतिष्ठेचीही अवमान्यता झालेली आहे. भारतीय राज्य घटनेनुसार प्रस्थापीत झालेल्या नितीमुल्यांचा विसर राजकारण्यांना पडत चालल्याचे हे निदर्शक आहे. दिवसेंदिवस राजकारणातील नितीमत्ता विसरुन अतिशय खालच्या स्तराचे राजकारण सध्या सुरू असल्याचे विदारक चित्र आहे.
त्यामुळे राणे यांच्या सदर वक्तव्याचे कदापिही समर्थन होऊ शकत नाही. आमची संघटना ही सदर वक्तव्याचा तीव्र निषेध करते. जनता मतदानाद्वारे आपल्याला पुढारपण देत असते त्याचे भान सर्वच राजकीय पक्षांनी ठेऊन व्यवहार करणे गरजेचे आहे. पंरतु सध्या संपुर्ण देश व राज्य कोरोना आपत्तीच्या संकटात असतांना
व जनता स्वतः च्या जीवन मरणाच्या प्रश्नांनी ग्रस्त असतांना जनतेच्या हालअपेष्टांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून केवळ सत्ता स्पर्धेचे राजकारण करण्यासाठी अश्या प्रकारची वक्तव्ये राजकारण्यांकडून वारंवार केले जाणे हे भारतीय लोकशाहीला अतिशय घातक ठरणारे आहे.राजकारण्यांच्या अशा व्यवहाराला जनता कधीच माङ्ग करणार नाही, असेही या पत्रकात म्हंटले आहे.

Tags:
Ahmednagar