भिंगारमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

। अहमदनगर । दि.25 ऑगस्ट । भिंगारमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक विशाल ढुमे यांच्यासह भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकत 29 जुगार्‍यांना अटक केली.

त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 3 लाख 99 हजार 650 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिस उपअधिक्षक विशाल ढुमे यांना भिंगारमधील भिमनगर येथील कमानीजवळ पत्र्याच्या खोलीत मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार उपअधिक्षक ढुमे यांनी सोवारी (दि.23) रात्री 9.45 च्या सुारास भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख व पथकासह त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. यावेळी तेथे 29 जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या ठिकाणी 2 लाख 77 हजार 150 रूपयांची रोकड तसेच 1 लाख 22 हजार 500 रूपये किंमतीचे मोबाईल व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले.

या 29 जुगार्‍यांविरूध्द पो.ना. भानुदास खेडकर यांनी दिलेल्या ङ्गिर्यादीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पो.ना. राहुल द्वारके हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post