। अहमदनगर । दि.06 जून । भरधाव वेगातील टाटाटेम्पोने रस्ता ओलांडणार्या पोलीस कर्मचार्यास धडक दिली. या धडकेत पोलीस नाईक भोसले हे गंभीर जखमी झाले. ही घटना गव्हाणवाडी चेकपोस्टवर बेलवंडी येथे घडली.
याबाबतची माहिती अशी पोलीस नाईक भोसले (नेमणूक पोलीस मुख्यालय, अहमदनगर) यांची बेलवंडी तालुक्यातील चेक पोस्टवर ड्युटी असताना ड्युटी दरम्यान आराम करण्यासाठी भोसले हे पेट्रोलपंपाकडे पायी जात असताना नगर कडून भरधाव वेगात येणार्या टेम्पोने (क्रमांक.एम.एच.04 एफ पी 3949 ) त्यांना डाव्या बाजूची दंडावर जोरात धडक दिली.
या धडकेत त्यांचा खांदा व बरगडीला फ्रॅक्चर झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.अपघात होताच टेम्पो चालक टेम्पो सह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी पोलीस नाईक भोसले यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलिस हवालदार कोळपे करीत आहेत