। अहमदनगर । दि.06 जून । बंद घराचे कुलूप कशाने ते तोडून चोरांनी आत प्रवेश केला व घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला ही घटना येथील भुतकरवाडी येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की पुष्पा अशोक कुमार जोशी वय.76 राहणार बंगला क्रमांक 9 आराधना स्टेट बँक कॉलनी भुतकरवाडी सावेडी यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कडी-कोयंडा अज्ञात चोराने कशानेतरी तोडून आत प्रवेश केला.
आणि आतील सामानाची उचकापाचक केली.बेडरूममधील कपाटातील लॉकर उघडून आतील पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 15 हजार रुपये रोख आता सुमारे 90 हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी पुष्पा जोशी यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार जपे हे करीत आहेत.
