। अहमदनगर । दि.06 जून । वाहनचालकांना रस्त्यात आडवून पोलीस असल्याची बतावणी करून शिवीगाळ मारहाण करून लूटणार्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई श्रीरामपूर तालुक्यात केली.
तोफिक सत्तार शेख, साजीद खलीद मलिक उर्फ मुनचून, जावेद मुक्तार कुरेशी, चोरीचे भंगार खरेदी करणारा जाकीर मन्सूरी उर्फ पिंजारी (सर्व राहणार श्रीरापमूर) व दरोडेखारांना माहिती पुरवणारा श्याम भाऊराव साळुंखे (रा.बेलापूर) यांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेला दरोडेखोर हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या ते जामिनावर बाहेर होते.
दि.27 मे रोजी ट्रकचालक श्रीधर सोनवणे हा ट्रकमध्ये भंगार घेऊन नगर येथून जात असताना दरोडेखोरांनी त्याला शनी शिंगणापूर फाट्याजवळ अडविले. आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करुन त्याला बळजबरीने त्यांच्या कारमध्ये बसून त्याचे अपहरण केले. तसेचे निर्जळ ठिकाणी नेऊन त्याला सोडून दिले.
यावेळी दरोडेखोरांनी सोनवणे याच्याकडील ट्रक चोरुन नेला. याप्रकारणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करीत असताना या दरोडेखोनांना जेरबंद केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे श्रीरामपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरिक्षक अनिल कटके, सहायक निरिीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलिस हेड कॉस्टेबल मनोज गोसावी, पोलिस नाईक सुरेश माळी, विशाल दळवी, दीपक शिंदे, शंकर चौधरी, सागर ससाणे, आकाश काळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.