। अहमदनगर । दि.09 जून । मोबाईल फोनवरून तरुणीला फोन करून प्रेमसंबंधाची मागणी करीत फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना नेवासा शहरातील गरुटेगल्ली या ठिकाणी घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, राहुल गडाख (रा. वरुटे गल्ली तालुका नेवासा ) याने एका तरुणीचा मोबाईल नंबर मिळवून त्याद्वारे त्या तरुणीला फोन करून तू मला आवडते, मी तुला लाईक करतो असे बोलून प्रेमसंबंधाची मागणी केली.
त्यानंतर त्या तरुणीला वारंवार फोन करून, व्हॉट्सप कॉल करुन, व्हाट्सअप चॅटींग करून सात ते आठ महिन्यापासून पाठलाग (फोलो) केला. तसेच त्या तरुणीचे फोटो आपल्याकडे असल्याचे सांगून त्याने तिला तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
घडलेल्या या प्रकाराबाबत पीडित तरुणीने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भा द वि कलम 354, 354 (ड) , 506 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाटेवाल हे तपास करीत आहेत.