। अहमदनगर । दि.09 जून । बलात्कार झालेल्या एका तरुणीने मानसिक त्रास होतो आत्महत्या केल्याची घटना शहरातील बोल्हेगाव परिसरात घडली.
या प्रकरणी पिडीत युवतीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोक्सो), आत्महत्येस प्रवृत्त करणे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोल्हेगाव परिसरात सतरा वर्षीय अल्पवयीन युवती आपल्या आई- वडिलांसोबत राहत होती. या युवतीवर कोणीतरी अज्ञात इसमाने अत्याचार केला. यामुळे ती युवती गर्भवती राहिली. अत्याचार झालेल्या युवतीला गर्भवती राहिल्याचा धक्का बसला.
या मानसिक त्रासातून तीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी बुद्धपौर्णिमेच्या वृद्ध तरुणीच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात पासून विरुद्ध बलात्कार पालकाची लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे पथक आरोपीच्या शोधात रवाना झाले आहे.
