करंजी घाटात ट्रक उलटला ; कापसाचे मोठे नुकसान

। अहमदनगर । दि.09 जून । नगर पाथर्डी रोडवरील अत्यंत अवघड असलेल्या करंजी घाटात मंबईहून नागपूरकडे कापसाच्या घाठी घेवून जाणार्‍या ट्रकला एका अज्ञात वाहनाने हूल दिल्याने हा एका धोकादायक वळणावर उलटला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र कापसाचे मोठे नुकसान झाले.

याबाबतची माहिती अशी की, मुंबईहून नागपूरकडे सुमारे वीस टन कापसाच्या गाठी घेऊन जात असलेला (एमएच 16 सीसी 7522) या क्रमांकचा ट्रक जात होता. सदरचा ट्रक सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास करंजीघाट उतरत असताना घाटातील एका धोकादायक वळणाजवळ समोरून येणार्‍या वाहनाने या ट्रक चालकाला हूल दिली.

समोरच्याने हूल दिल्याने कापसाने भरलेला ट्रक रस्त्यावरच उलटला असून, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही परंतु ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post