...कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा : छत्रपती संभाजीराजे

। कोल्हापूर । दि.04 जून ।  छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे.

 

तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून आपली भूमिका व्यक्त केली आहे. 

 

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. 

 

पुढील दिशा राजसदरेवरून जाहीर करणार : त्याचबरोबर ‘सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी..! माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन’, असंही संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post