। बीड । दि.04 जून । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यावरून काँग्रेसने मेटेंवर टीका केली आहे. उद्याचा बीडचा मोर्चा हा मराठा समाजाचा नसून भाजपचा आहे.
मराठा समाजाचा मोर्चा असता तर आम्हीही त्यात सहभागी झालो असतो, असं काँग्रेसने म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना खाले यांनी हे म्हंटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांनी ही टीका केली आहे. उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नाही.
मराठा समाजाचा या मोर्चाशी काहीही संबंध नाही. हा मोर्चा निव्वळ भाजपचा आहे. विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील हे भाजपच्या प्रचार समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे मोर्चा कुणाचा आहे हे स्पष्ट होते, असं सांगतानाच विनायक मेटे खोटं बोलण्याचं काम करत आहेत, अशी टीका लाखे यांनी केली.
