जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांचे ऑनलाईन शॉपिंगसाठी साईज्योती ‘ई’ मार्केट प्लेसचा 6 जूनला शुभारंभ

। अहमदनगर । दि.04 जून । 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनी अहमदनगर जिल्हा परिषदेत शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येणार आहे. यासह जिल्हा परिषद स्थापनेस 60 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल जिल्हा परिषद हिरक महोत्सव शुभांरभाचे औचित्य साधून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांनातंर्गत जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांचे ऑनलाईन शॉपिंगसाठी साईज्योती ‘ई’ मार्केट प्लेसचा शुभारंभ करण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांनी दि.06 जुन 1674 रोजी हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतर रहावे म्हणून स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतला तोच हा दिवस शिवराज्यभिषेक दिन आहे. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करुन महाराज शककर्ते ही झाले तोच हा शुभदिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.

अशा या भूमीपुत्रांच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि.06 जुन हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाकडिल परिपत्रक दि.01 जानेवारी 2021 अन्वये महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी 9.00 वा. सर्व पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे असे निर्देश दिलेले आहे.

त्याअनुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषद इमारतीचे आवारामध्ये दिनांक 06 जुन 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता  शिवस्वराज्य दिन  कार्यक्रमाचे आयोजन करणेत आलेले
आहे. सदर दिवशी अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते सकाळी 9.00 वा. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद स्थापनेस 60 वर्षे पुर्ण झालेने जिल्हा परिषद हीरक महोत्सव शुभांरभ तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अहमदनगर यांचेकडिल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांना अंतर्गत अहमदनगर जिल्हयातील स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांचे ऑनलाईन शॉपीग साठी साईज्योती ई मार्केट प्लेस चे शुभारंभ होणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष प्रतावराव शेळके, अर्थ, पशुसंवर्धन व कृषी समतीच्या सभापती सुनिलराव गडाख, सभापती बांधकाम व कृषी समिती सीापतीकाशिनाथ दाते, समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मिराताई शेटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा परिषद अहमदनगर व सर्व खाते प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post