तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकजण ठार; तर अन्य एक जखमी

। अहमदनगर । दि.05 जून । येथील नेवासेफाटा येथे नगर-औरंगाबाद रस्त्यावर राजमुद्रा चौकात झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकजण ठार, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माहिती अशी की, नगरवरून औरंगाबादला जाणारा ट्रक (एमएच 13 डीक्यु 0441) चालक मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवत होता. त्याने प्रथम मोटारसायकलीला व नंतर म्हैस घेऊन जाणार्‍या टेम्पोला उडवले आहे.

मोटारसायकलचालक विशाल बाबासाहेब कारभार (वय 17, भालगाव, ता. गंगापूर) जागीच ठार झाला. टेम्पोचालक पप्पू नवथर (पिंप्री शहाली) गंभीर जखमी आहे. त्याला नेवासेफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल सुहास गायकवाड, किरण गायकवाड, दिलीप कुर्‍हाडे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post