सन २०२१ च्या पावसाळयात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व शासकीय आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रण व लोकांना मोठया प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेता यावा यासाठी सवलतीचे दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये, रोपांचे वर्गीकरण- ९ महिन्याचे रोप (लहान पिशवीतील रोप) (१२.५ सेमी x२५ सेमी) वनमहोत्सव कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रतिरोप रु. १०, सर्वसाधारण कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रति रोप रु. २१, अठरा महिन्याचे रोप (मोठया पिशवीतील रोप) (२० सेमी x ३० सेमी) वनमहोत्सव कालावधीतील रोप विक्री दर प्रतिरोप रु. ४०, सर्वसाधारण कालावधीतील रोप विक्री दर प्रति रोप रु. ७३, अठरा महिन्याचे रोप (मोठया पिशवीतील रोप) (२५ सेमी x४० सेमी) वनमहोत्सव कालावधीतील रोप विक्री दर प्रतिरोप रु. ५० तर सर्वसाधारण कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रति रोप रु. १०५ असे असणार आहेत. तरी, अहमदनगर जिल्हयातील नागरिकांनी उपलब्ध क्षेत्रावर जास्तीत जास्त वृक्षारोपण करुन पर्यावरण पूरक उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वेबिनार मध्ये सकाळी ११ वाजता पारंपरिक बियाणे जतन व संवर्धन करणे काळाची गरज या विषयावर पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे , सकाळी ११-४० वाजता महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या विविध योजनांबाबत सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी भास्कर पवार आणि दुपारी १२-४५ वाजता कृषिवानिकी रोपवन नमुने या विषयावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कृषी वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बी.आर. नजन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती श्रीमती जमदाडे-कोकाटे यांनी दिली.
