नेवासे येथील एका पतसंस्थेच्या दोन संचालकांना अटक ; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई!

। अहमदनगर । दि.05 जून । नेवासा तालुक्यातल्या सोनई येथील व्यंकटेश पतसंस्थेच्या दोन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.  दोन कोटी एकवीस लाख रुपयांचा घोटाळा व्यंकटेश पतसंस्थेमध्ये झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी तेजकुमार गुंदेचा आणि गोपाल कडेल या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी सोनई पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली होती. त्यातील दोघांना जामीन मिळाला असून एक जण अद्यापही अटकेत आहे. त्या दोघांनी आर्थिक ‘सेटलमेंट’ केल्याचां त्यांच्यावर आरोप आहे.

व्यंकटेश पतसंस्थेत अनेक ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी जमा असून या पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांनी लाखो रुपयांच्या या ठेवी हडप करण्याचा प्रयत्न केलाय. जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या महत्वपूर्ण कामगिरीने या पतसंस्थेच्या ठेवीदारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post