। अहमदनगर । दि.05 जून । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी नेप्ती उपबाजारात फळ, भाजीपाला विक्री व कांदा लिलावास परवानगी दिली. काल गुरुवारी लिलावासाठी कांद्याच्या 10 हजार 868 गोण्यांची आवक झाली. लिलावात चांगल्या प्रतिच्या कांद्याला 1800 ते 2100 रुपये भाव मिळाला, अशी माहिती स्व.माजी खासदार दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे व सचिव अभय भिसे यांनी दिली.
कोरोनाच्या संकटामुळे 25 मार्चपासून कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर एक एप्रिलपासून भुसार, भाजीपाला फळे, फुले तसेच कडबा मार्केट बंद करण्यात आले. त्यानंतर 1 मे पासून नेप्ती उपबाजार भाजीपाला, फळांची विक्री सुरु करण्याचे आदेश उपविभागीय अधिकार्यांनी दिली. आता 1 जूनपासून जिल्हाधिकार्यांनी भाजीपाला, फळे व कांदा लिलावास सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान परवागनी दिली आहे.
कांदा लिलावाच्या पहिल्याच दिवशी कांद्याच्या 10 हजार 868 गोण्यांची आवक झाली. त्यात चांगल्या प्रतिच्या कांद्याला 1800 ते 2100 रुपये भाव मिळाला. दुय्यम प्रतिच्या कांद्याजा 1550 ते 1800 रुपये तर त्या खालोखालच्या कांद्याला 600 ते 1050 रुपये भाव मिहाला. लाहन कांद्याची 300 ते 600 रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झाली असे सभापती घिगे यांनी सांगितले.