। अहमदनगर । दि.10 फेब्रुवारी । कार्यालयातील कामकाजासाठी आणलेल्या इर्न्व्हटरच्या तीन बॅटर्या व एकयुपीएस असा सुमारे 15 हजार रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चाराने चोरुन नेला. ही घटना तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि.4) रोजी 11 वाजता घडली.
या बाबतची माहिती अशी की, नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयाने कार्यालयीन कामाजासाठी इर्न्व्हटरच्या तीन बॅटर्या व एक युपीएस असे 15 हजार रुपयाचे साहित्य आणले होते.ते साहित्य कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीसांनी ग्रामविकास अधिकारी रामभाऊ मुरलीधर आबुज (वय 49, रा.सत्यम शिवम सुंदरम अपार्टमेंट, बालिकाश्रम रोड) यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 380 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस हवालदार नगर हे करीत आहेत.
