हिवरेबाजारच्या उपसरपंचपदी पोपटराव पवार

। अहमदनगर  ।  दि.09  फेब्रुवारी ।  आदर्श  गाव  हिवरेबाजारच्या सरपंचपदी  विमल ठाणगे यांची तर उपसरपंचपदी पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.


बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रावसाहेब कर्डिले यांची निवड झाली आहे. तर उदलमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सपरंपचपदाची लॉटरी लागली आहे.


हिवरेबाजार ग्रामपंचायतीची 35 वर्षानंतर प्रथमच निवडणुक झाली होती. या निवडणुकीत पुन्हा पोपटराव पवार यांनी वर्चस्व सिध्द केले होते.


दरम्यान,  मंगळवारी (दि.9) रोजी सरपंच व उपसरपंच निवड झाल्या. यामध्ये पोपटराव पवार यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.


बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतच्या सरपंपपदी रावसाहेब कर्डिले यांची निवड झाली आहे. उदलमल ग्रामपंचायतीत 7 पैकी 6 जागा जिंकूनही सत्ताधीश गटाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे.


आरक्षणाचा उमेदवार नसल्याने येथे एकमेव निवडुन आलेले जोसेफ भिंगारदिवे यांना सरपचंपदाची लॉटरी लागली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post