। अहमदनगर । दि.10 फेब्रुवारी । बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या बॅगची चेन उघडुन अज्ञात चोरानी आतील चांदीचे दागिने चाळ, रोख रक्कम व मोबाईल असा सुमारे सहा हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
हि घटना द्वारकादास शामकुमार चे दुकान ते बाबा टॉईज दुकाना दरम्यान, कापडबाजार येथे मंगळवारी (दि.9) सोड चार वाजता घडली आहे.
या बाबतची अधिक माहीती अशी कि, वैशाली उमेश देवकर (वय 28, रा. हनुमान नगर, केडगाव ) या कापडबजार येथे खरेदी करीता गेल्या असता.
कोणीतरी अज्ञात चोरानी त्यांच्या सॅकची चेन उघडुन आतील 1800 रुपये किंमतीचे चांदीचे चाळ, चार हजार पाचशे रुपायांची रोकड, व सातशे रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा सात हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी वैशाली देवकर याच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास महिला पोलीस नाईक पठारे या करीत आहेत.
