मंगळसुत्र चोरीच्या घटना सुरुच

दुसर्‍या दिवशीही मंगळसुत्र चोरीच्या दोेन घटनांची नोंंद


। अहमदनगर  ।  दि10  फेब्रुवारी । मंगळवारी मंगळसुत्र चोरीच्या दोन घटना घडल्या असून तोफखाना व कोतवालीस ठाण्याच्या हद्दीत मंगळसुत्र चोेरीच्या घटनांची नोंद मंगळवारी (दि.9) करण्यात आली आहेे.


या बाबतची अधिक माहीती अशी की,चंद्रकला झुंबर पालवे (वय 49, रा.दत्तनगर, पाईपलाईन रोड,सावेेडी) या भाजी घेण्यासााठी रस्त्याने जात असताना एकविरा चौकासमोर मोटार सायकलवरुन आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील  40 हजार 300 रुपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावुन चोरुन नेले.


याप्रकरणी तोफखाना पोलिसांंनी चंद्रकला पालवे यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास सहायक पोेलिस निरिक्षक सुरसेे हेे करीत आहेे.


दुसर्‍या घटनेत बुरुडगाव रोडवरील अकोलकर हॉस्पीटल समोरुन मोटार सायकलवरुन दळण आणणे करिता जाणार्‍या डॉ.चंदा सुभाष मेहेर (वय 67, रा.वैभव हॉटेेल मागे, बुरुडगाव रोड,  नगर) यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र मोटार सायकलवरुन आलेल्या दोन मोटार सायकल चोरांनी हिसकावुन चोरुन नेले.


याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी डॉ.चंदा मेहर यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विवेक पवार हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post