गावठी कट्टा, काडतुसे जप्त ; आरोपीस पोलिस कोठडी

। अहमदनगर  ।  दि10  फेब्रुवारी । कोनोशी ते नांदूर रस्त्यावर गावठी कट्टा, काडतुसे बाळगणार्‍या दोघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. यातील एकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. 
 

पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना गुप्त खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून कोनोशी-नांदूर रस्त्यावर लिंबाच्या झाडाखाली उभे असलेल्या बाबासाहेब दादा बटुळे (27, भारजवाडी, ता. पाथर्डी) व एका मुलाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे मिळाली.


ही कारवाई सहायक निरीक्षक विश्वास पावरा, उपनिरीक्षक सोपान गोरे, हेकॉ. बी. एस. बडदे, कॉन्स्टेबल दिलीप राठोड, भानाजी काळोखे, राजेंद्र ढाकणे यांच्या पथकाने केली, अशी माहिती देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post