परंतु अनेक ठिकाणी खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत होते. मास्क न लावणे, रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरु ठेवणे, सॅनिटायझरचा वापन न करणे, तिन पेक्षा जास्त जण एकत्र येणे आदींचे पालन होत नसल्याने. याचा परिणाम कोरोनाचे बाधित रुग्ण वाढू लागल्याने आता पुन्हा निर्बंध घालण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणून जिल्ह्यात बुधवार (दि.23) पासून मध्यरात्री 12 वाजल्यापासून 15 मार्चपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 10 ते पहाटे पाच वाजेपर्यत ही संचारबंदी लागू राहील.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केलेल्या आहेत. त्यानुसारच जिल्हाधिकार्यांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचार बंदी 15 मार्चपर्यंत लागू राहणार आहे. या संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींना फिरण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत.
सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत दुकाने खुली राहणार आहेत. प्रत्येक दुकानदाराने दुकानात गर्दी होणार नाही. याची खबरदारी घेणे गरजेचे राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहणार आहे.
त्याबरोबरच लग्नसमारंभास फक्त 50 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. 50 पेक्षा जास्त उपस्थितीत लग्नसोहळे झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. जत्रा व यंत्रांवर बंदी घालण्यात आलेली आहे.
