कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक उतरले मैदानात

। अहमदनगर । दि.23 फेब्रुवारी । नागरीकांच्या बेजबाबदार पणामुळे,  तसेच नगरीकांमधून कोरानाचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलिस अधिक्षक मनोज पाटील हे आपल्या पथकासह प्रतिबंधात्मक कारवाईसाठी मैदान उतरले आहे.


राज्यात कोरानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन सतर्क झाले असून कोरोना संदर्भातील नियम न पाळणार्‍या नागरीकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यानुसार शहरात मास्क न वापरणारे व सोशल डिस्टसिंग न पाळणार्‍या नागरीकांवर कारवाईचा बडगा पोलिस प्रशासनाच्या वतीने उगारण्यात आला.


याकामी स्वतः जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलिस अधिक्षक मनोज पाटील हे आपल्या पथकासह कारवाईसाठी मैदानात उतरले असून सोमवारी दुपारी नगर औंरंगाबाद रोडवरील आर्शिर्वाद लॉनवर होत असलेल्या विवाह समारंभात सोशल डिस्टंन्स न पाळणार्‍या नागरीकांवर कारवाईचा बगडा उचलला आहे.


शहरातील आशीर्वाद लॉन्स , सिटी लॉन्स, ताज लॉन्स व नगर कॉलेज  येथे अचानक भेट देऊन पहाणी केली. या लग्न समारंभात सुमारे 200 ते 250 नागरीक उपस्थित होते. त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी पथकासह जावून कारवाई केली. तसेच औरंगाबाद रोडवरील सिटी व ताज लॉनमध्येही झाडा झडती घेतली. तसेच लॉन्स व मंगलकार्यालयाची तपासणी सुरु केली आहे.


मंगल कार्यालय, महाविद्यलयांनाही भेटी
जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी आज दुपारी नगर-स्टेशन रोड येथील अहमदनगर महाविद्यालयालाही भेट देऊन पाहणी केली. यावेळी ज्या विद्यार्थ्यांच्या तोंडला मास्क नव्हते त्यांच्यावर या पथकातील कर्मचार्‍यांकडून कारवाई केली जात होती. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांबात हे पथक काय भूमिका घेते याकडेही लक्ष लागले आहे.


कार्यालय चालकांवरही कारवाई
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आणि जिल्हा पोलिस  अधिक्षक मनोज पाटील यांच्या संयुक्त पथकाने सीटी लॉन, ताज, आशीर्वाद या मंगल कार्यालयांना भेटी दिल्या. यापुढेही मंगल कार्यालयांना भेटी देऊन निष्काळजीपणा करणार्‍या मंगल कार्यालयांच्या चालक-मालकांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगतले


Post a Comment

Previous Post Next Post