कर्जतमध्ये दोघे मोबाईल चोरटे गजाआड

। अहमदनगर । दि.23 फेब्रुवारी ।  रात्रीच्या वेळी घरासमोर झोपलेल्या लोकांचे मोबाईल चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. अविनाश बाळासाहेब घोलमे, रोहित उर्फ सोन्या दिपक काळे ( दोघे रा. शिंदा, ता. कर्जत) अशी गजाआड केलेल्या दोघांची नावे आहे. 

 

14 हजार 999 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या दोघांनाही कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोना संतोष लोंढे, दीपक शिंदे, शंकर चौधरी, पोकॉ प्रकाश वाघ, रवींद्र घुंगासे, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post