भाजपला दुसरा धक्का, उद्या जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादीत!


मुंबई, (दि.23 नोव्हेंबर) : जयसिंगराव हे अठरापगड जातींमध्ये, विशेषत: शेतकरी व युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

 

उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता मराठवाड्यातील भाजपनेते तथा माजी केंदीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड हे उद्या राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गायकवाड यांना पक्षात घेण्यासाठी संमती दिली आहे. 

 

उद्या मुंबईत शरद पवार आणि पक्षातील जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गायकवाड राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्यासोबत इतरही कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीची धामधूम चालू असताना, गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या जाण्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे

Post a Comment

Previous Post Next Post