लोणी, (दि.16 नोव्हेंबर) : : राज्यातील मंदिरे पूर्ववत खुली झाल्यानंतर भाजपचे नेते माजी मंत्री तथा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी येथील हनुमान मंदिरात जाऊन ग्रामस्थांसमवेत दर्शन घेतले.
करोनाचं संकट संपूर्ण संपुष्टात येण्यासाठी त्यांनी हनुमानाला साकडं घातलं. आ.विखे पाटील म्हणाले की, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे बंद झालेली मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले.
राज्यसरकारने याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारपासून मंदिर उघडण्यास परवानगी मिळाली. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लोणी येथील हनुमान मंदीरात जाऊन ग्रामस्थांसमवेत दर्शन घेतले व लवकरात लवकर सर्व पूर्ववत होण्यासाठी साकडे घातले.
विखे पाटील यांनी मंदिरात दर्शन घेताना मास्क परिधान करण्याचा नियम पाळून इतरांसमोर उदाहरणही ठेवलं.
