नगर, (दि.16 नोव्हेंबर) : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतच्या ग्रामदैवताचे दर्शन
घेतले. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांचे दरवाजे भक्तासांठी
पुन्हा उघडल्यानंतर रोहित पवार यांनी गोदड महाराजांचे दर्शन घेतले.
जनतेवरील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी रोहित पवारांनी ग्रामदेवतेला साकडं
घातलं.
मंदिराचे दार आज सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आले. राज्य सरकारचे मी आभार मानतो. कोरोनाच्या काळात गेल्या आठ महिन्यात आरोग्याचा विषय महत्वाचा होता, त्यामुळे अनेक अडचणी होत्या. लोकांनी एकत्र आल्यानंतर अनेक अडचणी वाढू शकतात. मात्र भाविकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.
आ.पवार यांनी मतदारसंघातील खर्ड्यात संत सिताराम बाबा व संत गितेबाबा यांच्या समाधीची पूजा करून दर्शन घेतलं. तसंच जामखेडमधील नागेश्वर मंदिर आणि दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं. कर्जतचं ग्रामदैवत सद्गुरु संत गोदड महाराज, राशीनला जगदंबा देवी आणि सिद्धटेकला गणरायाची भाविक आणि कार्यकर्त्यांसह मनोभावे पूजा आणि आरती केली.
